नानांना पाहायचे होते गाजराची पुंगी नाटक !
उज्ज्वला साळुंके
छत्रपती संभाजीनगर: मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीवर आपल्या
दमदार अभिनयाची अमीट छाप उमटविणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्याशी आपली एक दोन वेळा भेट झाली. मात्र त्या भेटींच्या आठवणी आजही मनात ताज्या आहेत, अशा शब्दांत ज्येष्ठ अभिनेते डॉ. दिलीप घारे यांनी नाना पाटेकर यांना आदरांजली वाहिली, नाना हे केवळ पडद्यावरचे मोठे अभिनेते नव्हते, तर रंगभूमी, नाटक आणि कलाविश्वाबद्दल मनापासून आस्था असलेले संवेदनशील कलाकार होते, अशी आठवण डॉ. धारे यांनी दैनिक सांजवार्ताशी बोलताना सांगितली.
डॉ. दिलीप धारे म्हणाले, माझी नाना पाटेकर यांच्याशी एक दोन वेळा भेट झाली होती. मात्र त्या भेटींच्या आठवणी आजही कायम आहे. माझे मित्र यशवंत देशमुख हे नाना पाटेकर यांचे खास मित्र होते. यशवंत आणि नाना यांच्यातील स्नेहाचे नाते अतिशय घट्ट होते. त्यांच्यासोबत गप्पा मारताना नाना पाटेकर यांनी अनेक विषयावर मनमोकळे बोलत होते. नाना पाटेकर यांच्याशी झालेल्या भेटीतील एक प्रसंग आज विशेष आठवत असल्याचे दिलीप घारे यांनी सांगितले. आपल्या 'गाजराची पुंगी' नाटकाचा उल्लेख नानांसमोर झाला असता, नाटक पाहण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. नाना मला म्हणाले होते की, मला गाजराची पुंगी हे नाटक पहायचे आहे. त्या काळात मी शूटिंगमध्ये व्यस्त असल्यामुळे त्यांना नाटक पाहता आले नव्हते. पुढे नाटकाचा प्रयोग लागला तर मला नक्की कळवा, अशी आठवण घारे यांनी सांगितली.
मी जवळून पाहिला आहे त्यांचा प्रवास
अभिनेते नाना पाटेकर यांचा रंगभूमीशी असलेला संबंध त्यांच्या संपूर्ण कलाप्रवासात कायम राहिला. चित्रपटसृष्टीत मोठे नाव कमावल्यानंतरही रंगभूमीशी असलेली त्यांची नाळ तुटली नाही. त्यांच्या अभिनयाची सुरुवातही रंगभूमीपासून झाली होती आणि पुढे त्यांनी मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली, नाना पाटेकर यांनी रंगभूमीपासून सुरू केलेला प्रवास हिंदी चित्रपटसृष्टीपर्यंत नेला. परिंदा सारख्या अनेक चित्रपटांमधून त्यांनी आपल्या अभिनयाची ताकद दाखवली. मराठी चित्रपटांमध्ये नटसम्राटसारख्या भूमिकांनी त्यांच्या अभिनयाची वेगळी उंची दाखवून दिली. हिंदी चित्रपट सृष्टीत मराठी माणसाने आपला दबदबा निर्माण केलेली मोजकीच उदाहरणे आहेत. त्या मोजक्या नावांमध्ये नाना पाटेकर यांचे नाव अत्यंत मोठे होते.
नानांचे स्वप्न पूर्ण झाले होते, मात्र प्रवास सुरूच होता
अभिनेते नाना पाटेकर यांनी आपल्या आयुष्यातील अनेक मोठी स्वप्ने पूर्ण केली होती. मात्र त्यांचा प्रवास अजून संपलेला नव्हता. आयुष्याच्या या टप्प्यावरही त्यांना परतीच्या काळात भरपूर चांगले काम करायचे होते. त्यांनी खूप जणांना आपली इच्छा बोलून देखील दाखविली होती. त्यांनी सुरुवातही केली होती. नाना पाटेकर आणि अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्यासोबत त्यांचे चांगले जिव्हाळ्याशी नाते होते. नाम फाऊंडेशनच्या निमित्ताने त्यांनी खूप काम केले होते. आज त्यांच्या आठवणी कितीही सांगितल्या तरी कमीच आहे. खूप मोठे नेते आज आपण गमावला आहे, अशी खंत डॉ. दिलीप धारे यांनी व्यक्त केली.















